जिद्द

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

पराभवावर मात करून डाव जिंकून घेण्याची जिद्द हवी

 

काहीही करून दाखविण्याची मनास नेहमी प्रेरणा द्यावी

नेहमी धडधडत्या हृदयास द्यावी चैतन्याची बळकट चावी

“मी काहीही करू शकतो” या उक्तीवर निष्ठा ठाम असावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

 

मेहनत आणि कौशल्य ह्यांची सांगड जिंकण्यास घालावी

नव नवे प्रयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रमांची कल्पकता असावी

जे घडविले ते जगासमोर आणून त्याची बिनधास्त महती गावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

 

कुणी पाय खेचलेच तरी आपल्या आत्मविश्वासास झळाळी द्यावी

कुणी निंदा केलीच तरी दुर्लक्ष करोनी आपली मते ठाम मांडावी

कुणी खोटारडी वृत्ती ठेवली तरी माफ करोन सत्य निष्ठा तेवत ठेवावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

 

कधी हार नशिबी आलीच तरी प्रयत्नांची पराकाष्ठा न सोडावी

हरण्याची कारणे शोधून त्यावरी सुधारणांची पर्जन्यरुष्ठी करावी

गर्भगळीत होऊन निपचित पडण्यापेक्षा नकार सीमा धाडसाने लांघावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

 

कितीही जिंकलो तरीही नम्रतेची जोड कधीही न सोडावी

सतत नवनवीन शिकण्याची वृत्ती जगताना कायम ठेवावी

आपणास ज्ञात झालेली विद्या इतरांस उदारतेने शिकवावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

 

उत्तम नेतृत्व शक्ती असावी, उत्तम वकृत्व कला असावी

सहनशील, सेवाभावी अन विशाल अशी वृत्ती असावी

नेहमी चांगल्या कामांसाठी तने, मने अन धने झिजवावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी

 

कितीही अडचणी आल्या तरी प्रकृती आनंदी अन तेजस्वी ठेवावी

दुख वगैरे ह्या गैरसमजुती अशी उमेद मनाशी बाळगावी

“परमेश्वर” आहे सर्वसत्ताधीश त्याची “महती” सदोदित गावी

काहीच अशक्य नसते पण शक्य करण्याची हिम्मत हवी!!

 

  • प. प्र. आचरेकर

(काव्यसंग्रह – शब्दमोहोर)

1 thoughts on “जिद्द

  1. Sir majya manat khup jiddh aahe pan mala barobar platform bhetat nahi ahe karan economical conditions thik nahi .
    12th science karun aata mi b.com open university la admition
    Karnar ahe .
    Please mala address kara .mo no.7410758775

यावर आपले मत नोंदवा