जिवनयुद्ध

यदि यह खुद से युद्ध है

फिर भी तुंम्हे कमजोरियोंसे युद्ध करना होगा

तुंम्हे कठनाईयोंको पराजित करना होगा

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

यदि यह घोर अरण्य है

फिर भी तुंम्हे खुद के उपर विश्वास रखना होगा

तुम्हे परबतोंसे रास्ता ढूंडना होगा

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

यदि यह आंधी तूफ़ान भी है

फिर भी तुंम्हे डटकर मुकाबला करना होगा

तुंम्हे खुद को मजबूत रखना होगा

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

यदि यह तेरे विरुद्ध भी है

फिर भी तुंम्हे संघर्ष करना होगा

संघर्ष से खुद को जितना होगा

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

यदि तेरा जिवन संघर्ष से भरा है

फिर भी तुंम्हे हार को हराना होगा

अपने हौसलों को जगाना होगा

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

यदि यह सूर्यास्त भी है

फिर भी तुंम्हे सूर्योदय तक रुकना होगा

प्रकाश के तेज से बहरना होगा

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

तुम्हारे बाजुओ में है दम विश्वास रख

तुम्हारे शत्रु है घायल विश्वास रख

तुम्हारे गुणों में है शक्ति विश्वास रख

कोई कुछ भी कहे तुम्हे सहना होगा

जितके जग को दिखाना होगा …

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

यदि यह गया साल भी है

उतर चढ़ाव से भरा हुआ भी है

फिर भी तुंम्हे संकल्प करना होगा

जो कोई ना बोले वोह कर के दिखाना होगा…

तुंम्हे लड़ना होगा तुंम्हे लड़ना होगा…

 

  • प. प्र. आचरेकर

संयुक्त महाराष्ट्र (पोवाडा) (beta Version)

मराठी स्वाभिमान जागला,

मोरारजी देसाई दूर फेकला,

जाहला संयुक्त महाराष्ट्र..

फडकला गगनी मराठी ध्वज… हो जी जी…

 

आला दार कमिशन, केला अपमान, मराठी प्रांत,

खोटा अहवाल, नको भाषावार, मराठी प्रांत,

जागला स्वाभिमान, करण्या वार, मराठी प्रांत,

करण्या अंत जुलमी दार कमिशनचा..

उठली संयुक्त महाराष्ट्र चळवळ… हो जी जी…

 

बापट अत्रे आंबेडकर

एस एम जोशी डांगे श्रीपाद

प्रबोधनकार उद्धवराव

साठ्ये अमर गव्हाणकर

ऐसे महान नेते कित्येक

देण्या स. का. पाटला दणका..

अवघा महाराष्ट्र एकवटला.. हो जी जी…

 

गिरणी कामगारांची शेतकऱ्यांची फौज उठली

विचारवंतांची कलाविष्कारांची फौज उठली

मध्यमवर्गीयांची स्वाभिमानाची फौज उठली

लेखकांची कवी काव्याची फौज उठली

पोवाड्यांची शाहिरांची फौज उठली

देण्या दिल्ली दरबारा झटका..

एकवटला अवघा मराठी प्रांत… हो जी जी…

 

हा अमुचा मराठी प्रदेश

आहे भव्य दिव्य मुलुक

कोंकण मालवण मुंबई

आहे मराठी भाषिक

खानदेश पश्चिम महाराष्ट्र

आहे मराठी भाषिक

विदर्भ मराठवाडा गोवा

आहे मराठी भाषिक

बेळगाव कारवार निपाणी

आहे मराठी भाषिक

देण्या देश सत्तेस इशारा..

खवळला अवघा मराठी प्रदेश… हो जी जी…

 

कोण करेल मुंबई स्वतंत्र

आहे का कुणात हिम्मत

नाही चालणार खपणार

दिल्लीची येथे हुकुमत

स्वाभिमान सन्मान

ठासला अमुच्या रगारगात

गर्जना मराठी गुंगते

उंच उंच गगनात

धडकते मराठी भाषा

अमुच्या ह्या हृदयात

रोखण्या दिल्लीचे कारस्थान..

भडकला अवघा महाराष्ट्र… हो जी जी…

 

फौंटन ला झाली लढाई…

अवघी मराठी जनता खवळली

मोरारजी ने काळीमा फासली

अवघी माणुसकी भस्म झाली

कोरी जखम ह्यांनी फाळली

हुतात्म्यांची आहुती जाहली

करण्या मुंबईसह हा महाराष्ट्र..

१०५ शूरवीर शहीद झाले… हो जी जी…

झाला हुतात्मा चौक अजरामर… हो जी जी…

झाली मोरारजीची हकालपट्टी… हो जी जी…

 

आला सुवर्ण दिवस १ मे १९६०

सूर्यकिरणे अवतरली थाटात

जाहला इतिहास हा यशवंत

स्वतंत्र झाले मराठी छत

झगमगला मराठी प्रांत

ना पाहिली जात पात

घेउनी स्वाभिमानाचे व्रत

घडविला कारभार मराठीत

विसरू नका हो त्यांचे ऋण

घ्या त्यांचे जरा हो गुण

देऊनी असंख्य बलिदाने..

जाह्ला संयुक्त महाराष्ट्र… हो जी जी…

  • प. प्र. आचरेकर

 

 

सांगा तुमचं काय गेलं?

मी अशी जगली

वा कशीही जगली

 

सांगा तुमचं काय गेलं?

 

मी नृत्यकला नाचली

वा रस्त्यात गाणी म्हटली

मैदानी खेळ खेळली

वा नाटकांत कामे केली

चित्रपटक्षेत्रे गाजवली

वा उच्च शिक्षणे घेतली

प्रेमा संसारासाठीही

कुणाबरोबर पळून गेली

 

सांगा तुमचं काय बिघडलं?

 

कमाविण्यासाठी नोकरी केली

वा कामावरून उशीरा आली

भिंतीवरी चित्रे काढली

वा आवडीसाठी नटली

एखाद्या मेजवानीस गेली

वा देशासाठी हेरगिरी केली

कुणाच्या प्रेमात पडली

वा दारुड्याची बाटली फेकली

 

सांगा तुमचं काय झालं?

 

न्यायदाने केली

वा उद्योजक झाली

पोलीस रक्षक झाली

वा सैनिक झाली

वेगवेगळी संशोधने केली

वा राजकारणात रमली

समाजसेवक झाली

वा वर्तमानपत्रात कलमे लिहीली

वकील कोर्टात लढली

वा साहित्य सेवा केली

सरकारी अधिकारी झाली

वा वैद्यकशास्त्र शिकली

शाळेत विद्या शिकवली

वा बाईन शेती केली

 

सांगा तुमचं काय बिनसलं?

 

मन मारून नाही जगली

हक्कासाठी लढली

साथीदारान साथ दिली

वा एकटी लढत राहिली

शेवटी जगली जगली

व जिंकली जिंकली

 

सांगा तुमचं काय नेलं?

 

सीतेन अग्निपरीक्षा दिली

कुठल्या हो कारणांन?

सिता-राम देव असुनी

समाजान डोळी मिटली

ना कळले कुणा

सीतारामाचेही मन

खुळ्या समाजासाठी

नसती नाटके रचली

ना रामही दोषी

ना सीताही दोषी

कुविचारी समाजान

सगळी परिस्थिती बिघडली

 

  • प. प्र. आचरेकर

ये मन की बात है भाई !!

पंछी गाये पिहू पिहू किसे समझ है आये,

कोई अकेला चलते चलते मन हि मन मुसकाये,

बात है फिर भी जिसके मन की उसे ही समझ है आये…

ये मन की बात है भाई !!

 

चढती लहरे डगर डगर पर नाव ये गोते खाये,

लढ लढ चलती अपने किनारे, जब लहरे ही सताये,

बात है फिर भी उस नाव की जिसे गहराई ही भाये…

ये मन की बात है भाई !!

 

पंछी उडता डाल डाल पर देखो खाना बटाये,

जीवन का जो मोड है तिखा फिर भी मन ललचाये,

बात है फिर भी जिसके जिंद की, क्यो दुनिया शोर मचाये…

ये मन की बात है भाई !!

 

खोजे दर दर अपने गंध को चादर ओढे जाये,

अंदर बाहर जोगी जोगन अपने को बिसराये,

बात है फिर भी जिसके दिल की, जहा प्रेम धूम मचाये…

ये मन की बात है भाई !!

  • प. प्र. आचरेकर

स्वाभिमान

हिम्मत रख, तुझे ख्वाबोन्को छुना है अभी,

कर उम्मीद ये, स्वाभिमान से जिना है अभी,

झुकेंगा आसमा, झुकेगा ये जहां, झुकेंगे पल ये सभी,

कर उम्मीद ये, स्वाभिमान से जिना है अभी ||

 

शोले जब आंख से बरसेंगे, जंजीरे भी पिघल जायेगी,

न थकेगा तन ये, ना भटकेगा मन ये, किस्मत खुद बुलायेगी,

झुमेगा आशिया, चमकेगा आईना, रुकेगा ना रास्ता कभी,

कर उम्मीद ये, स्वाभिमान से जिना है अभी ||

 

सच्चाई है चिख रही, कुदरत भी है तमाशा बना रही,

मन में है शक्ती दमकती, चारो दिशा अंगारे बरसाती,

डरेगा तुफान ये, बर्दाश्त ना जुलूम ये, मिट जायेंगी कठनायीया सभी,

कर उम्मीद ये, स्वाभिमान से जिना है अभी ||

 

राख कर दे बिता जंजाल, भय हो जहा शर्मसार,

मिट्टी को हात लिये, गोद में ले धरती का प्यार,

मै नही हु किसीसे भी कम, मेरी मेहनत मुझमे है दम,

माथे से मिटा दे बुरी लकीरे, रोक उनको जो खाये तेरी उम्मीदे,

हक को कर बुलंद इतना, के मिट जाये फासले सभी ये,

आसमा से जिसका हाथ आये, बनाये जो तेरी नयी तसबीरे,

रास्ते में मेरे ना कभी रुकावटे आये, न्याय हक उस खुदा ने बनाये,

मेरा काम मुझे करने दो, किसी को स्वाभिमान से जिने दो,

यह मेरी है मंजिले, यह मेरे है हौसले, जो ना थके कभी,

कर उम्मीद ये, स्वाभिमान से जिना है अभी ||

  • प. प्र. आचरेकर

हुंडा

माय बापानं वाढविली

पोर देखणी एकली

माणूस आहे वस्तू नव्हे

ती आहे लाखाची लक्ष्मी

सुखी ठेवा तीला

भरभराट होईल घरची

अपोआप धन येईल

मेहनतीन ओंजळी

पण पुरुषाच्या हाती पहा

कुणी बांगडी भरली

हुंडा मागावया

का जीभ नाही झिजली

पुरुषार्थ गाजवाया

का मनगटे तुमची हुकली

की कमवायची अक्कल

जगता जाता विझली

मेहनतीन कमवण्या

का बुद्धी नाही उरली

दळभद्री प्रथा ही

संसारा पायदळी तुडवी

भिकारी आहेती ते

नामर्द आहेती ते

जे हुंडा मागती…

जे हुंडा देती…

  • प. प्र. आचरेकर

मन माझे वेडे हिरव्या ऋतूच्या प्रथम दर्शनाने

मन माझे वेडे हिरव्या ऋतूच्या प्रथम दर्शनाने

 

दरवळला सुगंध मातीचा ह्या वरुणाच्या आगमनाने

मुक्त खेळती अन् बागडती वाऱ्याच्या वेगाने तृणे

 

कडकड कडकड विजा चमकती मेघांच्या आक्रमणाने

नभातून प्रकाशाचे जणू धरतीशी लपणे छपणे

 

समुद्र पहा कसा खवळला लाटांच्या रौद्र रूपाने

नद्या फुलल्या झरे निघाले गर्जत तुझ्या दिशेने

 

धरणी नटली हिरव्या वस्त्राने डोंगर दऱ्या वने

मंत्रमुग्ध करीतसे सृष्टी सौंदर्य धबधब्याच्या सौंदर्याने

 

नांगर घेउनी कृषिवान पाहतसे वाट तुझी आशेने

थेंब पडता जमिनीवरी कृषीजन नाचती आनंदाने

 

मोर नाचती तृप्त होऊनी तुजीया संगीताने

मन माझे वेडे हिरव्या ऋतूच्या प्रथम दर्शनाने

 

  • प. प्र. आचरेकर

गोष्ट परिवर्तनशील कवितेची

गोष्ट एका काळजाची

तुफानास भेदण्याची

स्वप्नांस छेदण्याची

उंचीवरी झेपण्याची

भितीस ठेचण्याची

गर्दीत चमकण्याची

अंधार मोडण्याची

गोष्ट एका काळजाची

 

गोष्ट एका वादळाची

गंभीर दुःखाची

टिकेच्या फैरींची

मुश्कील प्रसंगांची

शाब्दिक अपमानांची

उरातील ज्वालांची

कठीण अडथळ्यांची

गोष्ट एका वादळाची

 

गोष्ट एका क्रांतीची

मार्क्सची लेनिनची

अमेरिकन वा फ्रेंचची

शिवरायांची स्वराज्याची

१८५७ च्या उठावाची

भारतीय स्वातंत्र्याची

दलित चळवळीची

गोष्ट एका क्रांतीची

 

गोष्ट वसुंधरेची

वाढत्या तापमानाची

अनियमित हवामानाची

पशु व पक्ष्यांची

वितळणाऱ्या बर्फाची

सुसाट वृक्षतोडीची

नापीक जमिनीची

गोष्ट वसुंधरेची

 

गोष्ट एका मानवाची

बरोबरीच्या हक्काची

स्त्री व पौरुश्याची

जाती वर्ण द्वेषाची

शेतकरी कारागिरांची

सोसणाऱ्या गुलामांची

सामंत गरिबांची

गोष्ट एका मानवाची

 

गोष्ट मोजक्या शब्दांची

परिवर्तनशील कवितेची

  • प. प्र. आचरेकर

वार्धक्य

सुकलेली चामडी वा जीर्ण आवाज

उगा ती चिडचिड वा जुनाट पखवाज

लागले वळण वय उतरले आज

टाकुनी दिले अमुच्या बालकांनी जिथे

 

मन काहुरले चिरले वा फडफडले

कोवळे नातवाचे प्रेम कळवळले

ज्या हातानी पीठ दळले वा मळले

ते हात आज पोरके झाले जिथे

 

शिकवले पोरांसी घडविले तुपाशी

जाळियले स्वत:शी राहुनी उपाशी

माय बाप झटले ज्या लेकरासाठी

फुटला माईचा पिल्लासाठी पान्हा जिथे

 

अवघे धन वासरासाठी सरले

जीव फडफडला बाळ जेव्हा रडले

आनंदाश्रू गाळले जेव्हा लेकुर जिंकले

बालकांच्या सुखास सर्व जग उधळले जिथे

 

आज अमुची दवाही महाग झाली

आज अमुची जागाही मळली

आज अमुची पिल्ले सुखासी निजली

आम्हांसी टाकुनिया “वृधाश्रमी” जिथे

 

तिथे परकेही अपुले झाले

अंथरून पांघरून जगणे झाले

काय तकदीर कर्ज पिलानी फेडले

आंम्ही दोघे “एकले” जिथे

 

सांगतो जगास हे ऐसे “वार्धक्य”

जिथे शरीरही जीर्ण जगणेही क्षीण

तुटलेले दंत वा रोगट तन मन

ते “दैव” जागरूक फिरून याल जिथे

 

  • प. प्र. आचरेकर

 

मराठी ठिणगी शौर्याची (पोवाडा)

घेउनी हाती लेखणी धारधार,

तळपली नार, वाजली तुतारी शर्तीची,

मराठी ठिणगी शौर्याची… हो जी जी

 

कोण मर्द गडी टिकेल, अन जिंकेल हिच्यापुढे,

घेउनी वसा हिमतीचा, काळ्या मातीचा, कोण राहील उभा पुढे…

 

घेउनी हाती लेखणी धारधार,

तळपली नार, वाजली तुतारी शर्तीची,

पेटली मशाल शक्तीची… हो जी जी

 

आर कुठवर, सहन कराल, अन्याय ह्या दुनियेचा,

आम्हाही आहे, हक्क एकतेचा, बरोबरीचा पौरुष्याचा…

 

घेउनी हाती लेखणी धारधार,

तळपली नार, वाजली तुतारी शर्तीची,

घेतले निशाण भगवे… हो जी जी

 

जिजाऊ आई, सावित्रीबाईं, रमाबाई, झांशीची राणी,

गाथा शौर्याची पराक्रमाची मराठी ठिणगी…

 

घेउनी हाती लेखणी धारधार,

तळपली नार, वाजली तुतारी शर्तीची,

घेतला ध्यास क्रांतीचा… हो जी जी

 

कर्तुत्व अमुच्यात, रगारगात, नारीने घडविला देश,

समानतेचा स्त्री पौरुष्याचा देई जगास ऐका संदेश…

 

घेउनी हाती लेखणी धारधार,

तळपली नार, वाजली तुतारी शर्तीची,

घेतले निशाण एकतेचे… हो जी जी

 

घेउनी हाती लेखणी धारधार तळपली नार हो जी जी

झुंजली शक्ती पराक्रमाची हो जी जी….

-प. प्र. आचरेकर