तो हाका मारत राहिला

तो हाका मारत राहिला

तो हाका मारत राहिला
जन झोका घेंत राहिले
तो गेल्यावरती
जन स्तुतीगीत गायले

ऐकावयाचे होते जेंव्हां
कर्ण बधीर जहाले
स्तुतीगीत गाताना
त्याचे खरे भावं विझले

अर्थ त्याचा होतां खरा
त्या अर्थाचां अनर्थी झरा
विश्वाच्या केविलवाण्यां
गेल्यावरी आसूड ओढले

त्याचे खरे शब्दं विझले
त्याचे खरे अर्थ निजले
अनर्थ तेवढेच गाजले
शब्दं क्रूर रंगांनी सजले

अनर्थाचेच वाद जहाले
वादांतून महाअनर्थ भिजले
शून्यं व अवास्तव दर्शन
तया हाकांचे मोती झिजले

तया हाकांचे मोती झिजले
जन झोकाच घेंत राहिले
-प. प्र. आचरेकर