माझ कलम भारी झुंजार

माझ कलम भारी झुंजार

 

माझ कलम भारी झुंजार

त्याचे टोक शोभे दमदार

अक्षर उमटती भारदार

हाय अन्यायाचा प्रतिकार

 

माझ कलम भारी झुंजार

 

दौत काळजाची लाही, सोसला जातीभेद लयी,

उमटेल शब्द क्रांतीपाई, ऐसी समतेची लढाई,

माझ कलम भारी झुंजार

 

नारी भारतीय बहादूर, ऐसे ऐकतेचा अधिकार,

मने पुरुषी बेजार, स्त्री-शक्तीचा एल्गार,

माझ कलम भारी झुंजार

 

शेतमजुराच शोषण, भूकबळी वा कुपोषण,

लेखणी करील राखण, लुबाडाल जर जमीन,

माझ कलम भारी झुंजार

 

माजवाल किती हाहाकार, ना जुलमाला डरणार,

कामगार किती खपणार, सामंतशाही उलटविणार,

माझ कलम भारी झुंजार

 

खणून काढीन जुलूम, समाज न्यायाचं कलम,

गाळुनी मेहनतीचा घाम, हाय लोकशाहीस सलाम,

माझ कलम भारी झुंजार

 

हुंडाबळी  कारभार, बालविवाह रीत मोडणार,

स्त्री शिक्षणास झटणार, तळागाळाशी जागविणार,

माझ कलम भारी झुंजार

 

गावोगाव भटकून, गुन्हेगार हुडकुनी काढीन,

जनतेस न्याय देण्या, वसा पत्रकाचा घेईन,

माझ कलम भारी झुंजार

 

जर घडवाल बाल कामगार, असो अपंग वा बेजार,

तृतीयपंथाचा नको   धिक्कार, त्यांच्या हक्कास झटणार,

माझ कलम भारी झुंजार

 

माझ कलम लोकशाहीच

माझ कलम समतेच

माझ कलम क्रांतीच

माझ कलम न्यायाचं

 

छळ कराल कुठवर

देश ऐक्याचा विचार

देश न्यायाचा विचार

 

माझ कलम भारी झुंजार

  • प. प्र. आचरेकर

यावर आपले मत नोंदवा